भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाय जाय राउळासी । नको येऊं आम्हांपाशीं

jay jay raulasi | nako yeun amhampashin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जाय जाय राउळासी । नको येऊं आम्हांपाशीं ॥१॥ जाऊं आम्ही बरोबर । झाळा तिचा हो चाकर ॥२॥ तिजसंगें काम करी । ऐसा जाणा देव हरी ॥३॥ चहू हातीं धुणें केलें । जनी म्हणें बरें झालें ॥४॥