भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाय जणा देह जाईल नेणसी । लैकिक मिरविसी लाजसी ना

jay jana deh jail nenasi | laikik miravisi lajasi na

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जाय जणा देह जाईल नेणसी । लैकिक मिरविसी लाजसी ना ॥१॥ माझें माझें माझें मानिसी निभ्रांत । करिसी अपघात रात्रंदिवस ॥२॥ सांग तूं कोणाचा आलसि कोठोनि । दृष बुद्धि मनीं विचारी पां ॥३॥ धन संपत्ति करोनि मदें मातलासी । पुढत पुढती पडसी गर्भवासीं ॥४॥ पुत्र कलत्र दारा यांचा झालासी ह्मणियारा । यांच्या पातकाचा भारा वाहशील ॥५॥ अंतीं यमापाशीं बांधो-नियां नेति । कवतुक पाहती सकळ जन ॥६॥ नानापरी तुज क-रिती यातना । सांग तेथें कोणा बोभाशील ॥७॥ धन पुत्र दारा तुज नये कामा । एका मेघश्यामा वांचोनियां ॥८॥ विषयाचेनि संगें भुलशील झणें । भोगीसी पतन रात्रंदिवस ॥९॥ नामा ह्मणे ऐक ध्यायीं कमळापति । निजाचा सांगाति केशिराज ॥१०॥