भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाऊं पाण्या निसुरवाण्या । आळवीती गोड राण्या ॥ध्रु

jaun panya nisuravanya | alaviti god ranya ||dhru

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जाऊं पाण्या निसुरवाण्या । आळवीती गोड राण्या ॥ध्रु०॥ गोविंद गीतीं गाऊं गोविंद गीतीं गाऊं । आनंदें जाऊं पाण्या ॥१॥ खाऊं कंदमुळें आम्ही असों वनीं । न देखों श्रीकृष्ण न ऐकों कानीं ॥२॥ आम्ही गोड भिल्लिणी काय ऐसी बोली । तुझिया नामाची लागली आवडी ॥३॥ आजीचा दिवस आम्हां झालासे आनंदु । विष्णुदास नामा यानें लावियेला छंदु ॥४॥