भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाऊं म्हणतां पंढरी । यम थोर चिंता करी

jaun mhanatan pandhari | yam thor chinta kari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जाऊं म्हणतां पंढरी । यम थोर चिंता करी ॥१॥ धरितां पंढरीची वाट । पापें पळालीं सपाट ॥२॥ कळस देखतां नयनीं । होय पातकांची धुणी ॥३॥ घेता विठोबाची भेटी । दोष जाती उठाउठी ॥४॥ करितां चंद्रभागे स्रान । सर्व पापा घडे हान ॥५॥ नामा म्हणे रे केशवा । आह्मी करूं तुझी सेवा ॥६॥