भजनी मालिका
← भजनांकडे परत

जातीचे हे शिंपी विश्व जाणे यातें । प्रत्यक्ष सांगाते जेवविलें

jatiche he shimpi vishva jane yaten | pratyaksha sangate jevavilen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जातीचे हे शिंपी विश्व जाणे यातें । प्रत्यक्ष सांगाते जेवविलें ॥१॥ उच्छिष्ट निजमुखीं स्वीकारिलें याचें । उरलें तें तुम्हां कैचें क्रियाकर्म ॥२॥ न कळे हा निर्धार भ्रांति वाटे आम्हां । काय तुमचा नामा अंगभूत ॥३॥ नवल हे आवडी लौकिका वेगळी । बुडविले सकळीं समूळ धर्म ॥४॥ कोणा लोभें तुम्हां लावियेला चाळा । कृपेचा कळवळा निरोपमु ॥५॥ विचारिता तुम्ही आहां वेषधारी । लीला वोडंबरी दिसे तुमची ॥६॥ वर्णाश्रमधर्म न दिसे तुमच्या ठायीं । निर्धारुचि कांहीं न कळे आम्हां ॥७॥ वंद्य निद्य तुम्हां न दिसेचि कोणी । दृष्टी दुजेपणीं न पडे तुमची ॥८॥ विश्व आपरुप दिसे तुम्हां सर्व । नेणवे हे माव ब्रह्मांदिका ॥९॥ आम्हीं विश्वाअसलों वरवेषां तुमच्या । परी भाव अंतरीचा न कळे कांहीं ॥१०॥ आपुलें स्वहित देखोनि आपण । पाप अथवा पुण्य विचारावें ॥११॥ सर्वभावें करुनि विधीतें पाळावें । सर्वीं सांभाळावें वेदवचन ॥१२॥ वर्णाश्रमपरत्वें बोलिले जे धर्म । तें तें विहितकर्म आचरावेम ॥१३॥ स्वामींचे वचन स्वामीनीं पाळावें । यश मिरवावें उभयलोकीं ॥१४॥ तरी हा तुमचा जिवलग नामा । निर्धारितां आम्हां कळों आलें ॥१५॥