भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाती ब्रह्मादिक जाती चराचर । मायिक व्यवहार ऐशा परी

jati brahmadik jati charachar | mayik vyavahar aisha pari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जाती ब्रह्मादिक जाती चराचर । मायिक व्यवहार ऐशा परी ॥१॥ प्रकृति पुरुषाचा मांडियेला खेळ । जाईल सकळ नाशिवंत ॥२॥ चंद्र सूर्य जाईल जाईल मृगजळ । जाती तिन्ही ताळ शून्यापोटीं ॥३॥ होईल निरामय अवघे चराचर । ब्रह्मींचा विस्तार होईल ब्रह्मीं ॥४॥ नामा म्हणे स्वामी जाताती सकळ । ब्रह्मीं माया मूळ जाली कैसी ॥५॥