भजनी मालिका
← भजनांकडे परत

जरी म्हणसी देव देखिला । तरी हा बोल भला नव्हे नाम्या

jari mhanasi dev dekhila | tari ha bol bhala navhe namya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जरी म्हणसी देव देखिला । तरी हा बोल भला नव्हे नाम्या ॥१॥ जोंवरी मी माझें न तुटे । तंव आत्माराम कैसेंनि भेटे ॥२॥ खेचर साह्यानें मीं कांहीं नेणें । जीवा या जीव इतुलें मी जाणें ॥३॥