भजनी मालिका
← भजनांकडे परत

जप तप अनुष्ठान हरी । एकचि तो नमस्कारी

jap tap anushthan hari | ekachi to namaskari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जप तप अनुष्ठान हरी । एकचि तो नमस्कारी । भूतद्वेष कदा न करी । तप सामुग्री हेचि तुझी ॥१॥ हरी माधव यादवा । कृष्णा गोविंद केशवा । येणें करोनियां जीवा । सर्वकाळ रंजवी ॥२॥ स्मरतां हरीचें नाम । पळोनी जाति काळयम । तुटता नाना योनी जन्म । गर्भवासा मग नये ॥३॥ नामा जपे नामावळी । अखंड तप हेंचि सदाकाळीं । हरीनामें पिटोनि टाळी । हाचि तरणोपाय सकळांचा ॥४॥