भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणोनियां यम संतोषला मनीं । मंजुळ वचनीं काय बोले

janoniyan yam santoshala manin | manjul vachanin kay bole

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जाणोनियां यम संतोषला मनीं । मंजुळ वचनीं काय बोले ॥१॥ केली देवें कृपा पाठविलें मज । वरदान तुज द्यावयासी ॥२॥ सर्वही जीवाचा नियंता मी यम । इच्छिसी तो काम पूर्ण करूं ॥३॥ शिवरात्री आजी उपवास केला । शंकर तोशला बिल्वदळीं ॥४॥ नामा ह्मणे ऐसें ऐकतां वचन । पार-ध्याचें मन सुखावलें ॥५॥