भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्ममरणाचें भय मज दाविसी । तें म्यां ह्रषिकेशी अंगिकारलें

janmamaranachen bhay maj davisi | ten myan hrashikeshi angikaralen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जन्ममरणाचें भय मज दाविसी । तें म्यां ह्रषिकेशी अंगिकारलें ॥१॥ आतां माझी चिंता तुज कां पंढरिनाथा । असो दे भलभलता भलतेंच ठायीं ॥२॥ सुखदुःख भोगणें माझें मी जाणें । तुज तंव भोगणें नलगे कांहीं ॥३॥ नामा म्हणे माझे हेचि मनोरथ । होईन शरणागत जन्मूजन्मीं ॥४॥