भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मजन्मांतरीं झाला तुज श्रम । ह्मणोनियां ब्रह्म आलें येथें

janmajanmantarin jhala tuj shram | hmanoniyan brahma alen yethen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जन्मजन्मांतरीं झाला तुज श्रम । ह्मणोनियां ब्रह्म आलें येथें ॥१॥ राखतील गाई मारीतील दुष्ट । न करी बोभाट जनामध्यें ॥२॥ द्वादश गांव अग्नि करील प्राशन । वांचतील प्राण सकळांचे ॥३॥ चोरोनियां गाइ नेईल सौंगडे । लावील हा वेड ब्रह्मयासी ॥४॥ उचलील हा पर्वत हरील हा गर्व । तारील हा सर्व नाममात्रें ॥५॥ समुद्रीं हा नगरी रचील क्षणांत । चरित्र अद्भुत करील हा ॥६॥ सोळा सहस्र शत अष्ट नायिका । करील बाईका तुझा कृष्ण ॥७॥ त्रैलोक्यांत हाची उदाराचा राणा । देईल ब्राह्मण हेमपुरी ॥८॥ सांगुनिया ऐसें आशीर्वाद देऊनि । नामा म्हणे. मुनि जाता झाला ॥९॥