भजनी मालिका
← भजनांकडे परत

जंबुया द्वीपामाजी एक पंढरपुरगांच । धर्माचें नगर द्खा विठो पाटील त्वाचें नांव । चला जाऊं तया ठाया कांहीं भोजन मागाया

jambuya dvipamaji ek pandharapuraganch | dharmachen nagar dkha vitho patil tvachen nanv | chala jaun taya thaya kanhin bhojan magaya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जंबुया द्वीपामाजी एक पंढरपुरगांच । धर्माचें नगर द्खा विठो पाटील त्वाचें नांव । चला जाऊं तया ठाया कांहीं भोजन मागाया ॥१॥ विठोबाचा धर्म जागो । त्याचे चरणीं लक्ष लागो । ज्याशी नाहीं पंख पाय तेणें करावें तें काय । शुद्ध भाव धरोनियां पंढरीसी जाय इच्छिलें फळ देतो यासी नवलाव तें काय ॥२॥ सुदामा ब्राम्हण दु:खें दारिद्रें पीडिला । मुष्टिभर पोहे घेऊनि त्याचे भेटीलागीं गेला । शुद्ध भाव देखोनियां गांव सोनियाचा दिला ॥३॥ गण आणि गोत्नज सर्व हांसताती मज । गेलें याचें मनुष्यपण येणें सांडियेली लाज । विनवी तो शिंपी नामा संत चरणींचा रज ॥४॥