भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाळें टाकिलें सागरीं । उदक नयेची चुळभरी

jalen takilen sagarin | udak nayechi chulabhari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जाळें टाकिलें सागरीं । उदक नयेची चुळभरी ॥१॥ तैसें पापियाचें मन । ज्या नावडे हरिकीर्तन ॥२॥ सावजीं केला कोल्हा राव । तो न संडी आपुला भाव ॥३॥ गाढव गंगेसि न्हा- णीले । पुढती लोळूं ते लागले ॥४॥ श्र्वान बैसविलें पालखीं । वरती मान करूनि भुंकी ॥५॥ नगर नावडे विखारा । दर्पण नावडे नकठ्या नरा ॥६॥ पति नावडे शिंदळी । जाय परपुरुषाजवळी ॥७॥ नामा ह्मणे बा श्रीहरि । कोडय नावडे कस्तुरी ॥८॥