भजनी मालिका
← भजनांकडे परत

जैसा आंबा वर्षत पाडी । तैसी धरीं गोडी कीर्तनीं नाचें

jaisa amba varshat padi | taisi dharin godi kirtanin nachen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जैसा आंबा वर्षत पाडी । तैसी धरीं गोडी कीर्तनीं नाचें ॥१॥ न करी घातमात न लावी वेळू । तेणें हा गोपाळू अंतरला ॥२॥ दुधावरील साय मधेसी गोडी । तैसी धरी आवडी रामनामीं ॥३॥ जतीचा साटा तो वैष्णव लाटा । म्हणतसे विठा नामयाचा ॥४॥