भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगत्रयजीवन अंतर्निष्ठ ज्ञान । तरी संतासीं शरण रिघिजे भावें

jagatrayajivan antarnishtha dnyan | tari santasin sharan righije bhaven

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जगत्रयजीवन अंतर्निष्ठ ज्ञान । तरी संतासीं शरण रिघिजे भावें ॥१॥ हेचि भक्ति ज्ञान वैराग्याचे निधी । विवेकेंसीं बुद्धि नांदे माझी ॥२॥ हे श्रवणाचे श्रवण मननाचे मनन । हेचि निजध्यासन वैराग्याचे ॥३॥ म्हणोनि बैसलों संतांचे संगतीं । गोविंदा विश्रांति गहिनीनाथ ॥४॥