भजनी मालिका
← भजनांकडे परत

जागारे गोपाळांनो रामनामीं जागा । कळीकाळा आ-कळा महादोष जाती भंगा

jagare gopalanno ramanamin jaga | kalikala a-kala mahadosh jati bhanga

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जागारे गोपाळांनो रामनामीं जागा । कळीकाळा आ-कळा महादोष जाती भंगा ॥१॥ सहस्रदळ समान अनुहात ध्वनी उठी । नामाचेनि बळें पातकें रिघालीं कपाटीं ॥२॥ दशमी एक व्रत करा दिंडी दर्शन । एकादशी उपवास तुह्मी जागा जागरण ॥३॥ द्वादशी साधन कोठीकुलें उद्धरती । नामा म्हणे केशव ठाव देईल वैकुंठीं ॥४॥