भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगजेठी तेव्हां क्रोधावला चित्तीं । करीन मी शांति तुझी आतां

jagajethi tevhan krodhavala chittin | karin mi shanti tujhi atan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जगजेठी तेव्हां क्रोधावला चित्तीं । करीन मी शांति तुझी आतां ॥१॥ माझिया लेंकरा दिधलासे त्रास । करीन मी नाश आतां तुझा ॥२॥ त्रैलोक्यांत कोण ऐसा हो समर्थ । माझे शरणा-गत मारील जो ॥३॥ माझिया भक्तां कोण गांजी निर्दय । करीन प्रळय त्याजवरी ॥४॥ स्फुरताती दंड कांपती अधर । उठला सत्वर जगदीश ॥५॥ कळंबाचे वृक्षीं देव चढतसे । पीतांबर गोसे खोंची-यले ॥६॥ जगद्‍गुरु तेव्हां पुष्पमाळा काढी । टाकितसे उडी जळा-मध्यें ॥७॥ नामा ह्मणे शोकें व्यापिलें समस्त । करूनि एकांत मने ऐका ॥८॥