भजनी मालिका
← भजनांकडे परत

इंद्राचा विभाग भक्षी चक्रपाणी । रूप गोवर्धना धरू-नियां

indracha vibhag bhakshi chakrapani | rup govardhana dharu-niyan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
इंद्राचा विभाग भक्षी चक्रपाणी । रूप गोवर्धना धरू-नियां ॥१॥ क्रोधावला इंद्र गौळिया निंदीत । दावीन सामर्थ्य तुम्हां आतां ॥२॥ पोरांच्या बुद्धीनें वर्तताती सर्व । धरूनियां गर्व तेची करी ॥३॥ प्रलय मेघाच्या काढिल्या श्रृंखला । वर्षावें गोकुळा जा-ऊनियां ॥४॥ आज्ञा म्हणोनियां वंदियेला इंद्र । कोपे जैसा रुद्र प्रलयींचा ॥५॥ मुसळाच्या धारा मेघ वर्षताती । गारा पडताती शिळा ऐशा ॥६॥ मरताती पक्षी श्वापदें अपार । हिंवें नारीनर कांपताती ॥७॥ नामा म्हणे गायी हंबरडा ह्मणीती । येऊनी पडती कृष्णापुढें ॥८॥