भजनी मालिका
← भजनांकडे परत

इलुसाचि प्रपंच परि हा लटिकाअ । तेणें तुज व्यापका झांकियलें

ilusachi prapanch pari ha latikaa | tenen tuj vyapaka jhankiyalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
इलुसाचि प्रपंच परि हा लटिकाअ । तेणें तुज व्यापका झांकियलें ॥१॥ ऐसियाचा मज घालोनियां खेवा । स्वामिद्रोहि देवा करिसी मज ॥२॥ मेरुचिया गळा बांधोनि मशक । पाहसि कौतुक अनाथनाथा ॥३॥ नामा म्हणे देवा कळली तुझी माव । माझा मी उपाव करीन आतां ॥४॥