भजनी मालिका
← भजनांकडे परत

इच्छामात्रें मोडी ब्रह्मांडाच्या कोटी । चालिला जग-जेठी कंसद्वारा

ichchhamatren modi brahmandachya koti | chalila jag-jethi kansadvara

रचनाकार: संत नामदेव · अभंग
इच्छामात्रें मोडी ब्रह्मांडाच्या कोटी । चालिला जग-जेठी कंसद्वारा ॥१॥ मदोन्मत्त हस्ती देखोनियां हांसे । पीतांबर कांसे खोवियेला ॥२॥ सांवरोनी हातें केंसा देत गांठ । खोंवितसे नीत वैजयंती ॥३॥ खंब ठोकोनियां राहे पुढें उभा । सांवळी सुप्रभा अंगकांती ॥४॥ पाहोनियां शूक झाला समाधिस्थ । ऋषिमुनी समस्त वेडावले ॥५॥ दुष्ट पाही हत्ती घाली आंगावरी । क्षणार्धेंचि मारी गजालागीं ॥६॥ उपडोनियां दातं घेतसे श्रीधर । जाहला उद्धार कुवलयाचा ॥७॥ नामा म्हणे पुढें चालिला गोविंद । सावध सावध परिक्षिती ॥८॥