भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिश्चंद्र राजा सत्त्वनिष्ठ मोठा । स्त्रीपुत्र चोहोटामाजी विकी

harishchandra raja sattvanishtha motha | striputra chohotamaji viki

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरिश्चंद्र राजा सत्त्वनिष्ठ मोठा । स्त्रीपुत्र चोहोटामाजी विकी ॥१॥ तैसोंचि येथें मृगाअंगीं सत्त्व । वोपियेला जीव पारध्यासी ॥२॥ शिबीराजा अंग कापी नेटपाटें । सत्त्वासी पालट होऊं नेदी ॥३॥ ताम्रध्वजा शिरीं कर्वत घातला । नाहीं पालटला मनोधर्मा ॥४॥ नामा ह्मणे मागें बहुतीं केएले कीर्ति । तयां ऐसी रीति येथें दिसे ॥५॥