भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिस श्रवणीं ध्या वो नित्य तुझी । ठसावेल ध्यानीं अवघा राम जनींवनीं

haris shravanin dhya vo nitya tujhi | thasavel dhyanin avagha ram janinvanin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरिस श्रवणीं ध्या वो नित्य तुझी । ठसावेल ध्यानीं अवघा राम जनींवनीं ॥१॥ नयनीं सखा पहा कृष्ण न्याहाळुनी । प्रकाशलें तेज रवि गेला लपोनी ॥२॥ हरिचरणीं लावी मन दर्शन । झालीया जाती त्रिविधताप हरपोन ॥३॥ तुळसीचा सुंगध मस्तकीं धरा । नामा म्हणे चरण दृढ धरा ॥४॥