भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिपाठ गजरें केला जयजयकार । उठावले भार वैष्णवांचे

haripath gajaren kela jayajayakar | uthavale bhar vaishnavanche

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरिपाठ गजरें केला जयजयकार । उठावले भार वैष्णवांचे ॥१॥ टाळ मृदंग वाजती अपार । मिरविती भार वैष्णवांचे ॥२॥ दोहीं बाहीं उभे पताकांचे भार । मध्यें मनोहर गौतमी ते ॥३॥ विसोबा खेचरें पुंडलिका हातें । आणिलेंज साहित्य समाधीचें ॥४॥ नामा म्हणे हरि चांगदेवा स्नान । घाली आवडीनें प्रेमयुक्त ॥५॥