भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिहर ब्रम्हादिक । नामें तरले तिन्ही लोक

harihar bramhadik | namen tarale tinhi lok

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरिहर ब्रम्हादिक । नामें तरले तिन्ही लोक ॥१॥ ऐसा कथेचा महिमा । झाली बोलायाची सीमा ॥२॥ जपें तपें लाजविलीं । तीर्थें शरणागत आलीं ॥३॥ नामदेवा कीर्तनी । ध्वजा आल्या स्वर्गाहुनी ॥४॥ देव श्रुतीं देती ग्वाही । जनी म्हणे सांगूं कायी ॥५॥