भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिदासपणें उभवीला ध्वज । परि तें वर्मबीज न क-ळेची

haridasapanen ubhavila dhvaj | pari ten varmabij na ka-lechi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरिदासपणें उभवीला ध्वज । परि तें वर्मबीज न क-ळेची ॥१॥ काय करूं देवा जळो याची बुद्धि । जोंवरी नाहीम शुद्धि परलोकाची ॥२॥ मुद्रा धरूनि गळां घाली तुळसीमाळा । परि नाहीं जिव्हाळा स्वहिताचा ॥३॥ धरी बहु वेष वृथा करी दोष । नाम ब्रह्मरस अंगीं नाहीं ॥४॥ दुसरा हरिदास देखूनियां रंगीं । धांवो-निमां वेगीं ग्रासों पाहे ॥५॥ दुसरियाचें पद ऐकोनियां कानीं । क्रोधें पेटे वन्हि पर्वतींचा ॥६॥ दुर्जनाचे भये पळती साधुवृंदें । जैसीं तीं श्वापदें व्याघ्रा भेणेम ॥७॥ बोले नानायुक्ति वश करे सभा । दुसरा रंगीं उभा राहों नेदी ॥८॥ राजमानें श्रेष्ठ मोठे अधिकारी । त्यांपुढें कुसरी करिताती ॥९॥ घातमात करी नटे नानापरी । चं-चळ परनारी भुलवितो ॥१०॥ ऐसें नाम विटंबूनि करील जो हरि-कथा । तेणें परमार्था विघ्न केलें ॥११॥ जाई जुई उत्तम सुगंध क-स्तुरी । विष्टेच्या उदरीं आंथुरिला ॥१२॥ साडेपंधरा सोनें होतें पालवण्या । परि झालें हीण डीक लागें ॥१३॥ द्यावें दिव्यौषध रोगियाचें हित । केलिया कुपथ्य वांयां जाय ॥१४॥ चतुर्विध अन्न षड्रस पक्कान्नें । विटाळलें जाण श्वानमुखें ॥१५॥ ऐसें ह्मणतां माझी मळेल पैं वाचा । परि या वैष्णवांचा धर्म नव्हे ॥१६॥ संसारसागरु हरिकथा तारूं । तरिजे विचारू दुरी ठेला ॥१७॥ जे कथा ऐकती पसरोनी बाह्या । शांति क्षमा दया येती तेथें ॥१८॥ शांति क्षमा दया येती भेटावया । तेथें मोक्ष व्हावया विलंब काय ॥१९॥ आ-नंद नामाचा ऐकूनि गजर । ब्रह्मादिक हरिहर येती तेथें ॥२०॥ खुंटला अनुवाद मावळला शब्द । अनिर्वाच्य बोध प्रगटला ॥२१॥ वैकुंठ पांडून धांवें चक्रपाणि । कीर्तनाचा ध्वनि ऐकूनियां ॥२२॥ तेथें श्रोते वक्ते होतील नि:शाय । ऐशी पुण्यरूप हरिकथा ॥२३॥ शून्याचें नि:शून्य जेथें हरपलें । एकात्र मन झाले ध्यान तेथें ॥२४॥ नामा म्हणे माझी हरिकथा माउली । मोक्षपान्हा घाली भक्ता लागीं ॥२५॥