भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिभक्तीचा उभारिला ध्वज । परमार्थाचें बीज न क-ळेची

haribhakticha ubharila dhvaj | paramarthachen bij na ka-lechi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरिभक्तीचा उभारिला ध्वज । परमार्थाचें बीज न क-ळेची ॥१॥ काय करूं देवा जळो त्याची बुद्धी । जया नाहीं शुद्धि परलोकींची ॥२॥ मुद्रा धारण अंगीं तुळशीच्या माळा । परि नाहीं कळवळा खहिताचा ॥३॥ बहुरुपी वेष मिरविताती देहीं । पर-मार्थाची नाहीं आठवण ॥४॥ उपजीविकेलागीं घालिती पसारा । ज्ञान ते चौबारा विकीतसे ॥५॥ राजमान्य व्यापारी मोठे अधि-कारी । पुढें दावी कुसरी संगीताची ॥६॥ घातमात करी नटे ना-नापरी । चंचळ परनारी भुलवी तो ॥७॥ आपुलें लाघव दाऊनि वाडें कोडें । दुसर्‍याची पुढें होऊं नेदी ॥८॥ लटकें पैशून्य बोले दोष गुण । तेणें भयें कोण राहों शके ॥९॥ ऐसें नाम विटंबूनि करी हरीकथा । तेणें परमार्था विघ्न झालें ॥१०॥ सुगंध चंदन जवादि कस्तुरी । विष्टेचेचि थडी पडिली जैसी ॥११॥ नामा ह्मणे माझी हरिकथा माउली । विश्रांति साउली शिणलियाची ॥१२॥