भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोकुळीं गोपिका गोपाळ सकळ । मध्यें घननीळ क्रीडा करी

gokulin gopika gopal sakal | madhyen ghananil krida kari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गोकुळीं गोपिका गोपाळ सकळ । मध्यें घननीळ क्रीडा करी ॥१॥ करी खेळ मोठा स्थापिलें निशाण । स्वयें नारा-यण हाका मारी ॥२॥ मारियेला कंस दुर्घट दुर्जन । पुरवी वासना पांडवांची ॥३॥ पांडवांचें ध्यान धरूनि अंतरीं । नामा ह्मणे हरि साह्य करीं ॥४॥