भजनी मालिका
← भजनांकडे परत

घालूनि आसन साधिला पवन । घेतलें जीवन अंतरिक्षीं

ghaluni asan sadhila pavan | ghetalen jivan antarikshin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
घालूनि आसन साधिला पवन । घेतलें जीवन अंतरिक्षीं ॥१॥ पराहस्तें तृप्ति नव्हे जी दातारा । कृपा करुणा करुणा करा केशिराजा ॥२॥ जीवाचें जीवन तूं सर्वांचें कारण । धांव मजालागुन केशिराजा ॥३॥ अनाथाचा नाथ हेंज ब्रीद साचार । झणें माझा अव्हेर करिसी देवा ॥४॥ विष्णुदास नामा अंकियेला तुझा । विनवी केशिराजा प्रेमसुखें ॥५॥