भजनी मालिका
← भजनांकडे परत

गौळियाचे घरीं रहिवास गोकुळीं । तेथें तुह्मी सकळीं वास कीजे

gauliyache gharin rahivas gokulin | tethen tuhmi sakalin vas kije

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गौळियाचे घरीं रहिवास गोकुळीं । तेथें तुह्मी सकळीं वास कीजे ॥१॥ वसुदेव देवकी उदरीं जन्मेन । क्मसभयें राहीन गोकुळीं हो ॥२॥ तेथें आहे काज कळेल सकळां । आनंद सोहळा पुरवीन ॥३॥ नामा ह्मणे ऐसें देव बोलियेले । आपण ते गेले निजधामा ॥४॥