भजनी मालिका
← भजनांकडे परत

गौळियाचे घरीं कैवल्याचे दानी । परब्रह्म अंगणीं कीडतसे

gauliyache gharin kaivalyache dani | parabrahma anganin kidatase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गौळियाचे घरीं कैवल्याचे दानी । परब्रह्म अंगणीं कीडतसे ॥१॥ ऐसें कांहीं करा आलेनो संसारा । जेणें जोडे सोईरा पांडुरंग ॥२॥ करितां त्याचें काज मनीं न धरीं लाज । ह्मणे हे शरण मज सर्वभावें ॥३॥ राखे बळिचें द्वार पाहे त्याची वास । ह्मणे हा माझा दास अंतरंगु ॥४॥ गौळियांचें उच्छिष्ट मनीं न धरि वीट । आवडी निकट गोपाळांची ॥५॥ तरी क्रिया कर्म केलें होय सफळ । जरी ह्लदयीं गोपाळ येऊनि राहे ॥६॥ येरी ते मायावी जग भुलवणीं । नित्य विभांडणी सर्वभावें ॥७॥ नाभा ह्मणे ऐसे संतांचिये सोई । विठोबाचे पायीं मन ठेवीं ॥८॥