भजनी मालिका
← भजनांकडे परत

गरुडासि मग म्हणे पांडुरंग । साकल्य हें सांग पुंडलिका

garudasi mag mhane pandurang | sakalya hen sang pundalika

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गरुडासि मग म्हणे पांडुरंग । साकल्य हें सांग पुंडलिका ॥१॥ नामदेव कष्टी ज्ञानदेवासाठीं । घेऊन या तो भेटी नामयाच्या ॥२॥ संतप्रेम भेटी देव गुज गोष्टी । जाणत्याच्या पोटीं सर्व वसे ॥३॥ करी पांडुरंग येई त्याच्या मना । निमित्ताकारणा भक्त शोधी ॥४॥