भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकटी येकला सर्व हें सकळां । आपणची जाला विश्वहरी

ekati yekala sarva hen sakalan | apanachi jala vishvahari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एकटी येकला सर्व हें सकळां । आपणची जाला विश्वहरी ॥१॥ न कळे याची माव कैसा आहे भाव । सर्वांभूतीं देव गीता सांगे ॥२॥ भूतदया धरा भजावें श्रीधरा । नामा एक स्मरा विठठल ऐसें ॥३॥ नामा म्हणे देव पंढरी पाटणीं । पावेल निर्वाणीं नाम घेतां ॥४॥