भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकदां श्रीकृष्ण खेळत असतां । प्रवेशे अवचिता गोपीगृहीं

ekadan shrikrushna khelat asatan | praveshe avachita gopigruhin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एकदां श्रीकृष्ण खेळत असतां । प्रवेशे अवचिता गोपीगृहीं ॥१॥ दोहीं करीं तेव्हां नेत्र चोळीतसे । गोपी पुसते काय झालें ॥२॥ कृष्ण ह्मने माझे दुखताती डोळे । उपाय न कळे करूं काय ॥३॥ पुत्रा़ची जननी तिचें दूध मिळे । घालितांची डोळे बरे होती ॥४॥ गोपी ह्मणे दूध देतें मी काढून । तें नेमी घालून बरें करी ॥५॥ देव ह्मणे दूध तूं काधून देसी । कैसा गुण त्यासी येईल सांग ॥६॥ माझिया करानें पिळून देसी स्तन । तरी येईल गुण लवकरी ॥७॥ ऐकतांचि गोपी धांवे मारावया । पळे उठो-नियां नामा ह्मणे ॥८॥