भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक वेळ भेटी आलों भक्तराया । स्फुरति माझ्या बाह्या क्षेमालागीं

ek vel bheti alon bhaktaraya | sphurati majhya bahya kshemalagin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एक वेळ भेटी आलों भक्तराया । स्फुरति माझ्या बाह्या क्षेमालागीं ॥१॥ ऊठ पुंडलिका परतोनियां पाहें । जीवींचें आर्त काय सांग मज ॥२॥ जीवाचीं पारणीं फेडीं डोळ्यांची । वास श्रीमुखाची पाहूं देंइ ॥३॥ हेंची आर्त धरोनी आलों असें जीवीं । तें तूं सर्व पुरवीं भक्ताराया ॥४॥ नामयाचा स्वामि कृपेचा कोंवळा । ह्मणऊनि उतावळा भक्तालागीं ॥५॥