भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक संवत्सर जालासे सकळां । पाहावया आला ब्रह्मदेव

ek sanvatsar jalase sakalan | pahavaya ala brahmadev

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एक संवत्सर जालासे सकळां । पाहावया आला ब्रह्मदेव ॥१॥ पूर्ववत गायी गोपाळ देखिले । आश्चर्य वाटलें तेव्हं त्यासी ॥२॥ ब्रम्हांडांत ब्रह्मा दूजा असे कोण । केलेंसे उत्पन्न याजलागीं ॥३॥ घेवोनियां गोलों तेची आहे येथें । जावोनियां तेथें पाहातसे ॥४॥ भ्रांतीने व्यापीलें तयाचें तें मन । देखतों मी स्वप्न किंवा सत्य ॥५॥ नामा म्हणे एके ठायीं उभा राहे । न्याहाळून पाहे सकळांसी ॥६॥