भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक प्रहर रात्र झाली । फेरी विठ्ठलाची आली

ek prahar ratra jhali | pheri viththalachi ali

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एक प्रहर रात्र झाली । फेरी विठ्ठलाची आली ॥१॥ नामा म्हणे जनी पाहे । द्वारीं उभा कोण आहे ॥२॥ प्रभा घरांत दाटली । एक सराद सुटली ॥३॥ एकमेकां आलिंगन । नामा म्हणे जनी धन्य ॥४॥