भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक ह्मणती आह्मी देवचि जालों । तरी असे नका बोलों पडाल पतनीं

ek hmanati ahmi devachi jalon | tari ase naka bolon padal patanin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एक ह्मणती आह्मी देवचि जालों । तरी असे नका बोलों पडाल पतनीं ॥१॥ एक ह्मणती आह्मीम देवासमान । तरी घासील वदन यमराम ॥२॥ एक ह्मणती आह्मी देवाचींच रूपें । तुमच्यानि बापें संसार न तुटे ॥३॥ देवें वघियेलें दानवां दैत्यां । आह्मां आड जातां तृण न मोडे ॥४॥ देवें उचलिल्या शिळा मेदिनी । तुमचेनी एक गोणी नुचले देखा ॥५॥ विठ्ठलाचे पद जो कोणी अभि-लाषी । तो महा पातकी ह्मणे नामा ॥६॥