भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुष्ट तो दुर्जन दुरीच धरावा । संग न करावा पापि-याचा

dushta to durjan durich dharava | sang na karava papi-yacha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दुष्ट तो दुर्जन दुरीच धरावा । संग न करावा पापि-याचा ॥१॥ सर्पाचें पिलें सानें ह्मणऊनि पोशिलें । त्यासी पान दिधलें अमृताचें ॥२॥ नव्हे तें निर्विष न संडी स्वभावगुण । घेऊं पाहे प्राण पोसित्याचे ॥३॥ विष्णुदास नामा सांगतसे युक्ति । विवेक हा चित्तीं दृढ धरा ॥४॥