भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्लभ नरदेह झाला तुह्मां आह्मां । येणें साधूं प्रेमा राघोबाचा

durlabh naradeh jhala tuhman ahman | yenen sadhun prema raghobacha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दुर्लभ नरदेह झाला तुह्मां आह्मां । येणें साधूं प्रेमा राघोबाचा ॥१॥ अवघे हातोहातीं तरों भवसिंधु । आवडी गोविंदु गाऊं गीतीं ॥२॥ हिताचिया गोष्टी सांगूं एकमेकां । शोक मोह दु:खा निरसूं तेणें ॥३॥ एकमेकां करूं सदा सावधान । नामीं अनुसं-धान तुटों नेदूं ॥४॥ घेऊं सर्वभावें रामनाम दिक्षा । विश्वासें सकळिकां हेंचि सांगों ॥५॥ नामा ह्मणे शरण रिघों पंढरीनाथा । नुपेक्षी सर्वथा दीनबंधु ॥६॥