भजनी मालिका
← भजनांकडे परत

डोई बोडून केली खोडी । काया वागविली बापुडी

doi bodun keli khodi | kaya vagavili bapudi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
डोई बोडून केली खोडी । काया वागविली बापुडी ॥१॥ ऐसा नव्हे तो संन्यास । विषय देखोनि उदास ॥२॥ मांजराचे गेले डोळे । उंदीर देखोनि तळमळे ॥३॥ वेश्या झाली पाटाची राणी । तिला आठवे मागील करणी ॥४॥ नामा म्हणे वेष पालटे । परी तिला अंतरीचें ओसपण न तुटे ॥५॥