भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानराज माझी योग्यांची माउली । जेणें निगमवल्लि प्रगट केली

dnyanaraj majhi yogyanchi mauli | jenen nigamavalli pragat keli

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्ञानराज माझी योग्यांची माउली । जेणें निगमवल्लि प्रगट केली ॥१॥ गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंदलहरी प्रगट केली ॥२॥ अध्यात्म विद्येचें दाविलेंसें रुप । चैतन्याचा दीप उजळिला ॥३॥ छपन्न भाषेचा केलासे गौरव । भवार्नवीं नाव उभारिली ॥४॥ श्रवनाचे मिषें बैसावें येउनी । सामराज्य भुवनीं सुखी नांदे ॥५॥ नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ॥६॥