भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानदेव म्हणे शंका न धरिजे मनीं । दृष्टि दुजेपणीम न ठेवावी

dnyanadev mhane shanka na dharije manin | drushti dujepanim na thevavi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्ञानदेव म्हणे शंका न धरिजे मनीं । दृष्टि दुजेपणीम न ठेवावी ॥१॥ सुखें सुख घ्यावेम अनुभवोनी अनुभवावें । आहे तें आघवें ब्रह्मरुप ॥२॥ तो सुखाचा अनुवाद करी रे सुखरुपा । सुख वस्तुच्या दीपा नामदेवा ॥३॥ सुखाचिये ताटीं सुखची वोगरी । तृप्ती होईल थोरी क्षुधातुरा ॥४॥ पंढरीरायाचा तूं प्रेमभांडारी । आस पूर्ण करी मज याचकाची ॥५॥ विश्रांतीसी पात्रे तूंचि विष्णुदास । हा मज भरंवसा आहे तुझा ॥६॥ म्हणोनी तुझा संग धरिली थोर आस । झणीं होसी उदास भक्तराया ॥७॥ सिंधुहुनी सखोल सुरस तुझे बोल । आनंदाची वोल नित्य नवी ॥८॥ ते मज सादर ऐकव्वी सत्वर । श्रवण क्षुधातुर जाले माझे ॥९॥ जाणीव शहाणीव तरीच शोभे सर्व । जरी होय आविर्भाव वैराग्याचा ॥१०॥ ज्ञानदेवा म्हणे तूं भक्त अंतरंग । नलगे तुज पांग बहुज्ञतेचा ॥११॥