भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानदेव म्हणे भला भक्तराज । कळलें गौप्यगुज सर्व तुझें

dnyanadev mhane bhala bhaktaraj | kalalen gaupyaguj sarva tujhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्ञानदेव म्हणे भला भक्तराज । कळलें गौप्यगुज सर्व तुझें ॥१॥ धीर आणि चतुर सर्वस्वेम उदार । साजे तुज अधिकार प्रेमभक्ति ॥२॥ धन्य तूं संसारी भक्तभावशीळ । साधिलें तुवां केवळ प्रेमसुख ॥३॥ देउनी आलिंगन नामा धरियेला करीं । वंदियेलें शिरीं चरणरज ॥४॥ राउळा भीतरीं चला जाऊं वेगें । आज्ञा मागों दोघे तीर्थयात्रें ॥५॥ सत्वर उठोनी आले स्वामी जवळी । मस्तकें ठेवियेलीं चरणावरीं ॥६॥ जीवींचा निजभावो सांगे ज्ञानदेवो । ऐकोनी पंढरीरावो हासिन्नले ॥७॥ म्हणे तूं ज्ञानशीळ चिद्रूप केवळ । सबाह्यनिर्मल स्फटिक हैसा ॥८॥ सहज तीर्थरुप तूंचि निरंतर । असताम हा विचार काय करिसी ॥९॥ येरु म्हणे स्वामी बोलिलेती बरवें । परि सार्थक करावेम देहाचेम या ॥१०॥ प्रसंगें नामयाचेम संगति घ्यावें । म्हणोनी ज्ञानदेवें धरिले चरण ॥११॥