भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञान व्हावें आधीं ओळखावें नांवा । मग जावें गांवा तयाचिया

dnyan vhaven adhin olakhaven nanva | mag javen ganva tayachiya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्ञान व्हावें आधीं ओळखावें नांवा । मग जावें गांवा तयाचिया ॥१॥ या नामाचें मूळ त्या माजीं जो धाला । प्रपंच्याचा घाला मग नाहीं ॥२॥ नाम गावें प्रपंच सर्व आहे नाम । ब्रह्मानंदें प्रेम घनदाट ॥३॥ नामदेव म्हणे नंदाचिया घरीं । होता एक हरि दुजें नाम ॥४॥