भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञान सत्य मुक्त शुद्ध बुद्ध युक्त । कारण रहित निरं-जन

dnyan satya mukta shuddha buddha yukta | karan rahit niran-jan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्ञान सत्य मुक्त शुद्ध बुद्ध युक्त । कारण रहित निरं-जन ॥१॥ तें आह्मीं देखिलें चर्मचक्षु दृष्टीं । उभा वाळवंटीं पंढ-रीये ॥२॥ वेदां अगोदर तयां सहस्रमुखा । तें झालें पुंडलिका लोभापार ॥३॥ परतल्या श्रुती ह्मणती नेती नेती । आह्मां गातां गीतीं सांपडलें ॥४॥ स्वरूपाचा निर्धार ओलती पुराणें । शिणलीं दरूशनें वेवादती ॥५॥ नामा ह्मणे यांसी भावची कारण । पावा-वया चरण केशवाचे ॥६॥