भजनी मालिका
← भजनांकडे परत

ध्यान धारणा नलगे टाळी । विठो पाहावा उघडे डोळीं

dhyan dharana nalage tali | vitho pahava ughade dolin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ध्यान धारणा नलगे टाळी । विठो पाहावा उघडे डोळीं ॥१॥ विठो समाधीचें सुख । पाहतां हरे तहान भूक ॥२॥ नामा ह्मणे न करीं कांहीं । चित्त रंगलें हरीचें पायीं ॥३॥