भजनी मालिका
← भजनांकडे परत

धूप आणि दीप उजळिल्या ज्योति । तेव्हां ओसंडती अवघे जन

dhup ani dip ujalilya jyoti | tevhan osandati avaghe jan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धूप आणि दीप उजळिल्या ज्योति । तेव्हां ओसंडती अवघे जन ॥१॥ सोपान वटेश्वरें केला नमस्कार । उतरले पार भवसिंधू ॥२॥ घेतियेलें तीर्थ तंव झालें विकळ । झांकियेले डोळे ब्रह्मबोधें ॥३॥ निवृत्ति मुक्ताई राहिलिं बाहेरी । आतां तुम्ही हरि सांभाळावें ॥४॥ देव ऋषीश्वर निघाले बाहेर । केला नमस्कार नामदेवें ॥५॥