भजनी मालिका
← भजनांकडे परत

धिग्‍ तो ग्राम धिग्‍ तो आश्रम । संत समागम नाहीं जेथें

dhig‍ to gram dhig‍ to ashram | sant samagam nahin jethen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धिग्‍ तो ग्राम धिग्‍ तो आश्रम । संत समागम नाहीं जेथें ॥१॥ धिग्‍ ते संपत्ति धिग्‍ ते संतति । भजन सर्वांभूतीं नाहीं जेथें ॥२॥ धिग्‍ तोआचार धिग्‍ तो विचार । वाचे सर्वेश्वर नाहीं जेथें ॥३॥ धिग्‍ तो वक्त्ता धिग्‍ तो श्रोता । पांडुरंगकथा नाहीं जेथें ॥४॥ धिग्‍ तें गाणें धिग्‍ ते पढणें । विठठल नाम बाणें नाहीं जेथें ॥५॥ नामा म्हणे धिग्‍ धिग्‍ त्यांचे जिणें । एका नारायणें वांचूनिया ॥६॥