भजनी मालिका
← भजनांकडे परत

धर्मशास्त्री ऐसें बोलताती बोलें । तेणें चोजवलें चित्त त्याचें

dharmashastri aisen bolatati bolen | tenen chojavalen chitta tyachen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धर्मशास्त्री ऐसें बोलताती बोलें । तेणें चोजवलें चित्त त्याचें ॥१॥ आश्चर्याच्या डोहीं बुडाला पारधी । म्हणे कैसी बुद्धि याची पहा ॥२॥ रानींचीं रानवटें तया एवढें ज्ञान । प्रेमाचें जीवन वोसंडत ॥३॥ चाकाटली वृत्ति चित्त केलें स्थिर । दोघांचीं उत्तरें ऐकतसे ॥४॥ नामा ह्मणे हरणीहरणाचा संवाद । ऐकतां भवबंध तुटतसे ॥५॥