भजनी मालिका
← भजनांकडे परत

धर्म अर्थ मोक्ष काम । हाकारितां रामराम

dharma artha moksha kam | hakaritan ramaram

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धर्म अर्थ मोक्ष काम । हाकारितां रामराम ॥१॥ जें जें आवडे मनासी । त्यानें जावें पंडरीसी ॥२॥ चला आनंदें कौतुकें । पेठ भरली पुंडलिकें ॥३॥ न चले कोणाची थोरी । राया रंका एकी खरी ॥४॥ सांडोनियां आहे भाव । हाचि करावा व्यवसाव ॥५॥ विठा म्हणे विष्णुदास । आणिक न लगे सायास ॥६॥